दोडामार्ग प्रतिनिधी- दत्ताराम देसाई

४० वर्षापासून सुरू असलेली चंदगड दोडामार्ग बेळगाव बस मागील वर्षभरापासून बंद होती . ती बस बंद असल्यामुळे शाळकरी मुलांचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच बेळगाव चंदगड दोडामार्गे ये जा करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. याबाबत शाळकरी मुले प्रवासी वर्गातून बस सुरू झाली पाहिजे ही मागणी होती. ही बस सुरु करण्यासाठी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस , दत्ताराम देसाई यांनी वारंवार चंदगड परिवहन विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून अखेर शेवटी ही बस आज पासून पूर्ववत सुरू झाली ही बस आज दुपारी मेढे येथे आली असता या ठिकाणी या बसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी प्रवीण गवस,उपसरपंच मायकल लोबो, दत्ताराम देसाई,स्वप्निल देसाई,सुरज गवस,भीमराव राणे,आनंद शेटकर अजय सावंत सर, जनार्दन गवस,उदय गवस,सुनील सावंत,रामा गवस,संजय गवस,अमित गवस,आनंद वरक,सुहास सुतार,श्रेय देसाई,शाळकरी मुले व शिक्षक वर्ग ग्रामस्थ महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी प्रवीण गवस उपसरपंच मायकल लोबो,दत्ताराम देसाई यांनी चालक वाहक यांचा पुष्पगुच्छ व हार देऊन स्वागत केले. जनार्दन गवस यांनी श्रीफळ वाढवून बसचे पूजन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी प्रवीण गवस यांचे बस चालू केल्याबद्दल खूप आभार मानले व आपल्या हातून असे सामाजिक कार्य घडत राहो यासाठी खूप सार्या शुभेच्छा दिल्या शेवटी प्रवीण गवस यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आपले सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे हे सर्व शक्य आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहो ही इच्छा व्यस्त केली.बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

