तेल्हारा प्रतिनिधी…..
महाराष्ट्र शासन शालेय विभागाने नुकतेच या वर्षामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे आणि त्याची मुदत 5 जून ला संपत आहे आज रोजी या ऑनलाईन चुकीच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील तसेच आदिवासी भागातील त्यांच्या पालकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे ही साईड बंद राहणे आणि नेटवर्क नसणे इत्यादी तक्रारी विद्यार्थ्यांकडून येत आहेत तसेच कॉम्पुटर सेंटरवर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे कॉम्पुटर सेंटर वाल्यांकडून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात जास्तीचे पैसे घेतल्या जात आहेत मागच्या वर्षी ग्रामीण व शहरी भागामध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली ती पद्धत यावर्षी सुद्धा कायम ठेवण्यात यावी ऑनलाइन पद्धतीबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अपूर्ण आहे व पाच जून 2025 तारीख ही शेवटची आहे परंतु ग्रामीण भागातील आदिवासी भागात अनेक विद्यार्थ्यांच्या जवळ मोबाईल नसल्यामुळे ओ. टी.पी पण देण्याची अडचण अनेक विद्यार्थ्यांना होत आहे म्हणून शासनाने ग्रामीण भागाकरिता ऑनलाईन व ऑफलाइन दोन्हीही आणि शहरी भागाकरिता ऑनलाईन व ऑफलाइन पद्धत प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी व 20 जून पर्यंत किमान 15 दिवस साठी मुदत देण्यात यावी ही मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात येत आहे.
सदर निवेदन विकास राणे नायब तहसीलदार यांच्या मार्फत शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले या मागणीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी अशोक दारोकार वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुका अध्यक्ष यांनी दिला निवेदन देतेवेळी सिद्धार्थ शामस्कार विद्वत सभा जिल्हा समन्वयक, प्रकाश खोब्रागडे,आम्रपाली ताई गवारगुरु माजी सभापती जीवन बोदडे रवींद्र खर्चे मोहम्मद रजिक,प्रल्हाद बोदडे दिनकर भारसाकळे मोहम्मद इद्री देवानंद इंगळे ,आनंद बोदडे पत्रकार, अँड भूषण तायडे सिद्धार्थ शिवणकार मनोहर इंगळे शिवदास बोंबटकर प्रताप गव्हांदे, चंदू बोरसे ,अनिल मोहोड माजी पंचायत समिती सदस्य, विना मोहोड प्रकाश बोदडे राजिक शहा अमर भारसाकडे आदी उपस्थित होते