( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
आज दिनांक १६ जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा गोडाचीवाडी येथे एक अत्यंत स्तुत्य उपक्रम घडून आला. गोडाचीवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक व गलाई व्यवसायिक माननीय श्री. दत्तात्रय जालिंदर गोड यांनी आपल्या सामाजिक जाणीवेतून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खालील उत्कृष्ट प्रतीचे साहित्य प्रदान केले. त्यात एअर फुटबॉल (१ ),
व्हॉलीबॉल (१), स्टम्प सेट (१), मार्कर कोन्स(६)
सापशिडीचा बोर्ड लाकडी (१), चेस बोर्ड लाकडी (१), लाकडी लेझीम(१३), घुंगुर काठी(१३), क्रिकेट बॅट(१), लाकडी डंबेल्स(१३जोडी), टिपऱ्या(१३जोडी)
रबर बॉल्स(२) यांचा समावेश आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी हे साहित्य अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांना खेळातील उत्साह वाढावा, तसेच कवायत व सांस्कृतिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता यावेत, यासाठी या साहित्याचा मोलाचा उपयोग होणार आहे.
शाळेच्या वतीने माननीय श्री. दत्तात्रय गोड सर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
त्यांनी दिलेले हे योगदान विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा देणारे व शाळेच्या प्रगतीला हातभार लावणारे ठरेल.