( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आटपाडीत घ्यावे. संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेल्या आटपाडीशी संबंधीत पाच मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव सर्वानी करावा . या मागणीसह अन्य अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी राज्यातल्या अनेक मान्यवर महोदयांकडे, सादिक खाटीक यांनी आग्रही अपेक्षा व्यक्त केली आहे .
आटपाडी तालुक्याशी संबधीत दोन आणि आटपाडी तालुक्यातील तीन अशा पाच प्रज्ञावंत साहित्यीकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवून आटपाडी तालुक्याचा मोठा सन्मान केला आहे . आटपाडी तालुक्याबरोबरच माणदेशात शेकडो प्रज्ञावंत, गुणवंत निर्माण झाले आहेत. अनेक शतकांचा हा समृद्ध वारसा आहे . साहित्य, सांस्कृतीक, कला, नाट्य वगैरे क्षेत्राचा प्रगल्भ इतिहास लाभलेल्या आटपाडीत कला, नाट्य, सांस्कृतीक, साहित्य क्षेत्राला न्याय देणारी साहित्य सृष्टी आटपाडीत उभी केली पाहीजेच . शिवाय समृद्ध साहित्यिक पार्श्वभूमी असलेल्या आटपाडीत अखिल भारतीय साहित्य संमेलन झालेच पाहिजे. ही भावना योग्य व अत्यंत न्यायाची आहे . म्हणून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आटपाडीत संपन्न झाले पाहीजे . त्यासाठी शासनकर्त्यांसह, साहित्य संमेलनाशी निगडीत सर्वांनी हे स्वप्न वास्तवात आणावे . अशी आग्रही अपेक्षा, मागणी आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांना प्रसार माध्यमे, सोशल मिडीयातून राज्यातील लोकप्रतिनिधी , त्या त्या क्षेत्रातील मान्यवर महोदयांना उद्देशुन केली आहे .
आटपाडी तालुक्याशी अन्य अनेक महत्वपूर्ण मागण्या बाबत सादिक खाटीक यांनी आपली भुमिका यावेळी स्पष्ट केली .
आटपाडी तालुक्यासह १३ दुष्काळी तालुक्यांच्या शेतीच्या पाणी प्रश्नासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे, आणि ज्यांच्या लढ्याच्या – चळवळीच्या रेट्यातूनच त्या त्या वेळच्या शासनकर्त्यानी टेंभू योजना वास्तवात आणण्याचे काम केले . त्या टेंभू योजनेच्या खऱ्याखुऱ्या जनकाचे अर्थात महान क्रांतीकारक, क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांचे नांव संपूर्ण टेंभू योजनेला द्यावे . आणि क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांचे १३ दुष्काळी तालुक्यासह संपूर्ण भारताला दिशादर्शक ठरेल असे जागतिक दर्जाचे स्मारक आटपाडीत उभारावे.
गेल्या अनेक वर्षापासून आटपाडीचा माणगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उस उत्पादक शेतकरी, उसतोड कामगार , वाहतुक व्यवस्थेशी निगडीत लोक, कारखान्यात काम करणारे कामगार, अधिकारी व कारखान्यावर अवलंबून असणारे इतर अनेक घटक, गावोगावचा व्यापार – उदिम पुरता उध्वस्त झाला आहे . शेतीचे शाश्वत पाणी नसतानाही जवळ जवळ ३ दशके अनेक संकटांशी दोन हात करत माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्याकडून कारखाना चालविला गेला . तथापि दारात आलेल्या कृष्णामाईच्या अमृताने, आटपाडी तालुक्याला पाण्याचे अच्छे दिन आले असताना, उस व्यवसाय – व्यवस्थेला अत्यावश्यक असणारा माणगंगा सहकारी साखर कारखाना नव्या दमाने आणि चौपट ताकदीने सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे . कोणाच्याही माध्यमातून माणगंगा साखर कारखाना तातडीने सुरू करा . अथवा राजारामनगर, इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे सर्वात मोठे युनिट आटपाडीत तातडीने सुरू करावे . तसेच वीज निर्मितीसह वेगवेगळ्या उपपदार्थावरील अन्य कारखानदारीही आटपाडी तालुक्याच्या वैभवात भर घालणारी ठरावी .
आटपाडीच्या नगरपंचायतीची इमारत व अन्य सर्व सोपस्कर, आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रिक्त होणाऱ्या प्रशस्त आणि आटपाडी शहरांच्या सर्व बाजुंनी मध्यभागी आणि एस . टी . स्टॅन्डला लागूनच असलेल्या जागेत साकारले जावे, ही जनभावना आहे .
आटपाडी, कवठेमहंकाळ , जत खानापूर, मंगळवेढा, सांगोला, माण, खटाव या सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील माणदेशी तालुक्यांचा स्वतंत्र माणदेश जिल्हा व्हावा . या माणदेश जिल्ह्याचे मुख्यालय – जिल्हा ठिकाण म्हणून माणदेशाचे सर्वच बाजुंनी केंद्रबिंदू ठरणारे आटपाडी शहर निश्चित केले जावे . ही न्याय मागणी पन्नास वर्षापासून होत आहे . ती वास्तवात यावी .
राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन १४० वर्षानंतर तरी सांगली जिल्ह्याकडे यावे . राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने इतर सर्व प्रश्न मार्गी लागावेत .
८७ वर्षापासून उपेक्षित असलेल्या स्वतंत्रपूर येथील कैद्यांच्या खुल्या वसाहतीत जागतिक दर्जाचे बदल व्हावेत . आटपाडीचे डबई कुरण, लगतचे क्षेत्रासह आटपाडी तलावापासून आटपाडी शहराकडे झेपावणाऱ्या दोन्ही ओढा पात्रात पक्षी अभयारण्य , ऑक्सीजन पार्क, चिंचबन आणि चालण्यासाठीचा ट्रॅक साकारणे आवश्यक आहे .
आटपाडीच्या दोन्ही ओढ्याची प्रशस्त पात्रे, शहरातल्या अनेक शासकीय जागांवर आणि देवस्थान इनाम वर्ग – तीन च्या जमिनीवर केले गेलेले प्रचंड अतिक्रमण नेस्तनाबुत केले पाहीजे .
उत्कृष्ट बँड वाजविण्याचा अनेक दशकांचा समृद्ध वारसा असलेल्या आटपाडीच्या ब्रास बँडला उर्जितावस्था दिली गेली पाहीजे . ब्रास बँड भवन आणि ब्रास बँड नगरी उभारीत राज्यात आदर्श निर्माण केला पाहीजे .
थोर साहित्यीक शंकरराव खरात यांच्या जन्मगावी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे तसेच शंकरराव खरात यांचे जागतिक दर्जाचे स्मारक आटपाडीत झाले पाहीजे .
सर्वच बाजुंनी उपेक्षित, वंचित, मागास राहीलेल्या शेंडगेवाडीचा चौफेर विकास व्हावा . आणि शेंडगेवाडी ते बनपूरी हा काँक्रीटचा रस्ता सत्वर निर्माण व्हावा . शेंडगेवाडीसाठी पन्नास कोटीचे विशेष पॅकेज तातडीने मंजूर केले जावे .
कराड – विटा – आटपाडी – पंढरपूर आणि बारामती आटपाडी मार्गे विजयपूर ( विजापूर ) असे दोन नवे रेल्वे मार्ग सुरू करून आटपाडी तालुक्याचे शतकापासूनचे स्वप्न वास्तवात यावे .
बेंगलोर कॉरीडोर सारखी दहा हजार एकरात साकारणारी माणदेशातली सर्वात मोठी आणि सर्व समृद्ध औद्योगिक वसाहत आटपाडीची नवी ओळख बनवावी . सौर उर्जा, पवन उर्जा निर्मिती करणारी यंत्रणा आटपाडी तालुक्यात उभारावी आणि ती देशात सर्वात मोठी उर्जा व्यवस्था आटपाडीची ठरावी .
जाग्यावर उभे असताना २४ तास आणि जाळतानाही ऑक्सीजन देणाऱ्या आणि हजारो वस्तु पदार्थ बनविले जाणाऱ्या बांबु शेतीला आटपाडीच्या आर्थिक परिवर्तनाची कामधेनू बनवावे . अशा महत्वपूर्ण मागण्यां त्यांनी केल्या आहेत.