तालुका प्रतिनिधी : अमोल संगमवार

येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रभाकर पांडे याना अंगणवाडी भरती प्रकरणी निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिले आहेत.या प्रक्लपा अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती पण याभरती प्रक्रियेत घोळ केल्याच्या लेखी तक्रारी होत्या तक्रारीच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यवतमाळ याना उमेदवारांनी केल्या अनुषंगाने चौकशीसमितिने चौकशी केलीअसता प्राप्त तक्रारीत तथ्य आढळून आल्याचा अहवाल मिळताचमहाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील १९६४ चे नियम ३ मधील तरतुदीनुसार प्रकल्प अधिकारी प्रभाकर पांडे याना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती नेर ठेवण्यात आले आहे