उदगीर : भरधाव ट्रक व कारच्या धडकेत तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना लातूर- उदगीर करडखेल पाठीजवळ तालुका उदगीर बुधवारी तारीख 23 दुपारी चार वाजता घडली. ट्रक (एचपी 39 -टी- 36 86) आणि कारची (एम .एच. २4,व्ही- 0163) समोरासमोर धडक झाली. या अपघातात यादव तुळशीराम काळे वय 58, राहणार सुगाव ,विठ्ठल बाबुराव येचवाड वय 77 ,आणि बब्रुवान मारुती मेखले वय 73, यांचा मृत्यू झाला. हुजूर दुलरखा पठाण वय 56 हे गंभीर जखमी झाले. हेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचारानंतर त्यांना उदगीर येथील रुग्णालयात हलविण्यात आले .हे सर्व जन माजी सैनिक होते. बीट अंमलदार राहुल नागरगोजे, कॉन्स्टेबल बाळासाहेब गडदे, नाना शिंदे आदींनी मृतदेह हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले .दरम्यान अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ती सुरळीत केली.तरी अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे करडखेल ग्रामस्थांकडून गतीरोधक करण्याची मागणी केली जात आहे.कारण हा चौरस्ता फार धोकादायक झाला आहे.तरी शासनानी याची दखल घ्यावी अशी ग्रामस्थांकडून विनंती केली जात आहे.