जळगाव जिल्हा प्रतिनिधी / दिनेश सोनवणे –
नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अडावद ता. चोपडा जि. जळगाव आज दि. १२ जून २०२५ रोजी विठ्ठल आफ्रो बी.सी.आय. संस्थेतर्फे जागतिक बाल मजुरी विरोधी दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे कर्मचारीनी बालकांचे हक्क अधिकार व बालकांनी जोखमीची कामे करू नयेत असा संदेश दिला संस्था गेल्या सहा वर्षांपासून तालुक्यातील ७४ गावांमध्ये सुधारित कापूस आदर्श पध्दत प्रकल्प राबवित आहे तसेच लोकसहभागातून नाला खोलीकरण, वृक्षारोपण असेल असे अनेक सामाज उपयोग कार्यक्रम राबविण्यात येत आहेत या वेळी विद्यार्थ्यांना चित्रकला वही व पेन्सिल वाटप करण्यात आली. आदर्श शेतकरी पालक व संस्थेचे मार्गदर्शक श्री.प्रदीप भाई गुजराथी व प्रोजेक्ट मॅनेजरश्री.सजय देशमुख पी.यु.मेनेजर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी मित्र-समाधान धनगर, कैलास गवळी कृषी सखी जयश्री कोळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यांनी परिश्रम घेतले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर.जे. पवार सर उप मुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर व पर्यवेक्षक श्री. के. आर. कनखरे सर यांनी देखील जागतिक बाल मजुरी विरोधी दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.