(‘प्रदीप जोशी, पत्रकार, विटा )
विटा नगरपालिका हद्दीमध्ये फुलेनगर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या कबरस्थान मध्ये नागरिकांना बसण्याकरता बाकडी व या कबरस्थान परिसरामध्ये झाडे लावून मिळणे करिता मुस्लिम समाजातील नागरिकांनी आमदार सुहास अनिलराव बाबर
यांच्याकडे मागणी केली होती. तातडीने स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांच्या स्मरणार्थ आमदार सुहास भैया बाबर व अमोल दादा बाबर यांनी मुस्लिम कब्रस्तान मध्ये नागरिकांना बसण्यासाठी बाकडी दिली. या कब्रस्तानमध्ये बसवण्यात आलेल्या लाकडी बाकड्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी युवक नेते माजी नगरसेवक व विरोधी पक्ष नेते अमोल दादा बाबर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कबरस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण हे करण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष अँड धर्मेश भैय्या पाटील युवक नेते भालचंद्र कांबळे प्रकाश बागल विटा शहर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग भिंगारददवे युवक नेते ज्या सपकाळ विटाच्या राजाचे उपाध्यक्ष पप्पू दाजी पवार अतुल कांबळे फिरोज भाई शेख व मुस्लिम समाजातील सर्व नागरिक उपस्थित होते