महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात नावाजलेले मराठी हिंदी दैनिक अहिल्याराज द्वारा वर्धापन दिन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित ‘ इंडियन एक्सलन्स अवार्ड 2025′ साठी माणगाव(आंबेडकर नगर) ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग येथील *श्री. वसंत महादेव कदम * यांची निवड करण्यात आली क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्री.वसंत महादेव कदम यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.
दैनिक अहिल्याराज वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कारनगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी इंडियन एक्सलन्स अवार्ड चे आयोजन करण्यात येते यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर , वकील ,महिला, सहकार, पतसंस्था, कला , इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये माणगाव (आंबेडकर नगर) ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथील *फुटबॉल क्रीडा * श्री.वसंत महादेव कदम यांची निवड फुटबॉल क्रिडा क्षेत्रातील इंडियन एक्सलन्स अवार्ड साठी करण्यात आली असून दिनांक १ जून २०२५ रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तिथे मान्यवरांच्या हस्ते श्री वसंत महादेव कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.