अडगाव प्रतिनिधी | १ सप्टेंबर २०२५
नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ, बाजारपुरा यांच्या वतीने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अकोला येथील डॉ. बी. पी. ठाकरे रक्तपेढीचे सहकारी या शिबिरासाठी उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी रक्तदान करून केले. यावेळी आडगाव छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकजभाऊ देशमुख यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच आडगाव शिवाजीनगरचे पोलिस पाटील हितेशभाऊ हागे यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट करून तरुणांना रक्तदानासाठी प्रेरित केले.
या शिबिरात दिलीपराव देशमुख, प्रफुल देशमुख, मंगेश पंधरे, अनुप देशमुख, योगेश देशमुख, दिवाकर कोहरे, आकाश पांडव, मनोज नेमाडे, किशोर रेळे, यश कोल्हे, दिवाकर सोळंके, नितीन कोल्हे, शेषराव वानखेडे, नितीन तेलगोटे, अमोल वानखेडे, सागर धूरदेव, अनिल चव्हाण, मुकेश वानखेडे, निलेश नृपनारायण, संदीप इंगळे, अभिषेक अंभोरे, अंकुश तायडे, संदीप उईके, तेजराव वानखेडे आदींनी रक्तदान केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. ठाकरे रक्तपेढीच्या वतीने रक्तदात्यांचे आणि मंडळाचे आभार मानण्यात आले.