🗓️ दिनांक – ३ ऑगस्ट २०२५ | 📍 संभाजीनगर, बोरमळा, नाशिक रोड ✍️ प्रतिनिधी : शशिकांत दा. भालेराव
संभाजीनगर बोरमळा येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल च्या नुतन इमारतीच्या कोनशिला उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख मुख्य अतिथी डॉ. रोहीत पिसाळ, चेअरमन – बुद्धिझम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड, संस्थापक – क्युशा गोल्ड कंपनी (जगातील दुसऱ्या क्रमांकाची सुवर्ण खाण), तसेच आशिया पॅसिफिक ट्रेझर आयु थापा मॉनिस्ट्री यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
उद्घाटन सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. प्रमुख अतिथींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना धुपदीप प्रज्वलन करण्यात आले. बुद्ध भिक्खू महेंद्र बोधी यांच्या वंदनेने वातावरण पवित्र झाले.
🎙️ मुख्य अतिथी डॉ. रोहीत पिसाळ यांचे मनोगत:
“एक काळ होता जिथे आपल्या गळ्यात मडके होते, आज मी सोन्याच्या एक किलोच्या बुद्धमूर्तीसह देशभर फिरतो, हे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच शक्य झाले आहे. शिक्षण हा खरा मुलमंत्र आहे – आणि याच शिक्षणावर मी माझे आयुष्य उभे केले. याच शाळेचे विद्यार्थी संविधानाचे कलम व नृत्य सादर करताना पाहून, त्यांच्या प्रगतीचे दर्शन घडते.”
🧑🏫 अध्यक्ष नितीन डांगळे सर यांचे भाषण:
“बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची सुरुवात एका पत्र्याच्या खोलीत झाली होती, आज ती स्वतःच्या भव्य इमारतीत पोहोचली – हे शिक्षकवृंद आणि पालकांच्या विश्वासाचे फळ आहे. पुढे ही शाळा कॉलेजमध्ये रूपांतरित होईल, आणि त्या उद्घाटनाला डॉ. रोहीत पिसाळ हेही हजर राहतील.”
🎉 कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. सुजाता त्रिभुवन (विभागीय अधिकारी), जितेंद्र सपकाळे (पोलीस निरीक्षक), सिद्धार्थ इंगोले (अध्यक्ष – बोधी बहुद्देशीय संस्था), योगिता थोरात (मुख्याध्यापिका), अशोक जगताप, अरुण भदरंगे, चंद्रभामा केदारे, सुहास पवार, अनिल मोरे, प्रमिला घोगरे, जितेंद्र साळवे, मीनाताई गांगुर्डे यांचा समावेश.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सुषमा उबाळे मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन थोरात मॅडम यांनी केले.
पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.