( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे करीत असताना वनविभागाचा अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामध्ये जलसंपदा, महावितरण, पाणीपुरवठा, बांधकाम इ. विभागातील कामात वन विभागाने अडथळा केला आहे. याप्रश्नी आमदार सुहास बाबर यांच्या मागणीनुसार वनमंत्री गणेश नाईक यांनी सह्याद्री अतिथी गृहावर बैठक आयोजित केली होती. खानापूर विधानसभा मतदारसंघात विकासकामे करत असताना वनविभागाचा अडथळे दूर करावेत असे नियोजन करा अशा सूचना वनमंत्री नाईक यांनी दिल्या.
या बैठकीत बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, “वनविभागामुळे शेटफळे येथे सबस्टेशनसाठी पाचेगाव (ता. सांगोला जि. सोलापूर) हद्दीमध्ये ३ पोलचे आणि हिवतड येथे सबस्टेशनसाठी ताडाचीवाडी (ता. खानापूर जि. सांगली) हद्दीमध्ये काम रखडले आहे.
मँगाणवाडी / वासंबे ता. खानापूर येथील जलजीवन मिशनच्यायला कामाला अडथळा निर्माण झाला आहे.nटेंभू उपसा सिंचन योजनेचे खानापूर, आटपाडी व तासगांव तालुक्यातील काम देखील वन विभागाच्या अडथळ्यामुळे थांबले आहे. यासह घोटी बु., बलवडी खा, ता. खानापूर येथे रस्त्याचे काम, किंदरवाडी-अडसरवाडी रस्ता आणि घानवड-भाग्यनगर रस्ता काम, अशी कामे मंदावली आहेत. असे आमदार सुहास बाबर यांनी निदर्शनास आणून दिले.
यानंतर मंत्री गणेश नाईक यांनी
खानापूर विधानसभा मतदारसंघात विकासकामे करत असताना वनविभागाचा अडथळा होणार नाही याचे नियोजन करावे व वनविभागाचे अडथळे दुर करावेत असे सुचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या . या निर्णयामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील वन विभागाचा व्यत्यय आल्याने रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत. बैठकीस अपर मुख्य सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), नागपूर. प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव), नागपूर. अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (नोडल ऑफिसर), मुख्यवनसंरक्षक, कोल्हापूर. यांची प्रमुख उपस्थिती होती.