( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
शहरात माणसांना जसा कर असतो तसा आता प्राण्यांना देखील लागू करण्याच्या विचारात यंत्रणा आहे. कुत्रा पाळण्याची हौस असणारानी आता सावध राहण्याची गरज आहे कारण त्यांना पाळत असलेल्या कुत्र्याचा कर देखील भरावा लागणार आहे. ज्यांना कुत्रा पाळायचा आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमीआहे. मुंबई महानगर पालिकेने कुत्रा पाळणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, आता प्रत्येकाने पालिकेकडे वार्षिक ₹100 कर भरावा लागणार आहे. या नव्या निर्णयामुळे आता कुत्रा पाळणं अधिक जबाबदारीचं ठरणार आहे. पूर्वी ग्रामीण भागात चोराच्या भीतीपोटी किंवा घराच्या शेताच्या राखणीसाठी कुत्रा पाळला जात असे. आज शहरात कुत्रा पाळण्याची फॅशन आहे. घराघरात कुत्रे पाळले जात आहे. काही ठिकाणी दोन दोन कुत्री पाळली जात आहेत. गावठी कुत्री कमी पण डॉबरमन आलषे शियन कुत्री केवळ हौस म्हणून पाळली जात आहेत. त्यांच्या खाद्यावर लसीवर मोठा खर्च केला जात आहे. त्यांच्या गळ्यात पट्टा बांधून त्यांना फिरायला घेऊन जाणारी मंडळी पुण्या मुंबईत कमी नाहीत. त्याचे लोण आता ग्रामीण भागात देखील आले आहे. शहरातील सदनिकेत अशा कुत्र्यांचा वावर मोठा आहे. त्यासाठी वाद देखील होत आहेत. आता मात्र या कुत्रा प्रेमिना अधिक सावध राहण्याची गरज आहे. कारण आता त्यांच्यावरही वार्षिक कर आकारला जाणार आहे. सध्या महापालिका स्तरावर त्याच्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या जात आहेत. हळूहळू त्या पालिका पंचायत स्तरावर देखील येणार आहेत.