( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
विटा मध्ये गेली 15 वर्ष सुळकाई ग्रुप असून हा ग्रुप सुळकाई डोंगर व परिसरामध्ये रोज फिरावयास जातो. मागील पाच वर्षापासून हा ग्रुप रेबणसिद्ध मंदिरापर्यंत रोज सायक्लिगं करतो. सायकल चालवा आणि जीवनाचा आनंद घ्या हे ब्रीदवाक्य ग्रुपचे आहे.
सायकल चालवताना चार करवंदे जांभळे आंबे इत्यादी गोष्टींचा ग्रुप रोज मनसोक्त आनंद घेत असतो.
मध्यंतरी या ग्रुपने धाडसी निर्णय घेऊन विटा ते पंढरपूर ही शंभर किलोमीटरचे अंतर यशस्वी पार केले. या ग्रुपमध्ये 40 वर्षापासून 65 वर्षापर्यंतचे सभासद आहेत. हे सर्वजण या वारीमध्ये सहभागी झालेले होते. साधारण सहा तासांमध्ये सर्व सभासद पंढरपूरला पोहोचले.
ग्रुपच्या या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीची दखल विटा येतील नामांकित पतसंस्था पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेने घेतली. या सर्व सभासदांचा मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. या कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक गायकांनी पंढरपूरची गाणी म्हणून केली. या कार्यक्रमात प्रत्येक सहभागी व्यक्तींना गुलाल आणि बुक्का व गांधी टोपी प्रधान केली होती. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी अमृत निंबाळकर, वैभव राजहंस,संतोष तारकर, माऊली लोटके यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी दीनदयाळ परिवारातील व सुळकाई ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक शिवप्रसाद शेंडे यांनी केले. आभार लकडे यांनी मानले.