( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
कडेगाव तालुक्यातील कडेगाव, शाळगाव, कारंडेवाडी, शिवाजीनगर, चिंचणी, हिंगणगाव बुद्रुक, कोतीज हे सात तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे येथील पाणी प्रश्न निकालात निघाला आहे. मे जून महिन्यात येथे पाऊस चांगला झाला. त्यामुळे सातही तलाव तुडुंब भरले आहेत. तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. चिंचणी तलाव भरल्याने सोनहिरा, कडेगाव, कोतमाई ओढे प्रवाहित झाले आहेत. खरीप पिकांना त्याचा फायदा झाला आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी समाधानी आहे. सततच्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. लहानमोठे ओढे, नाले ओघळी वाहू लागल्या आहेत. तालुक्यातील सातही तलाव ओसंडून वहात आहेत. येरळा व नांदणी या नद्या दुथडी भरून वहात आहेत. टेंभू ताकारी अरफळ योजनेचा फायदा देखील झाला आहे. वळीव च्या मुसळधार पावसाने चांगला आधार दिला आहे. दिवसेंदिवस पाणी साठ्यात वाढ होत आहे. पावसाने आडसाली ऊस पिकाचे मात्र नुकसान झाले आहे.