प्रतिनिधी( माणिक बनसोडे ) छत्रपती संभाजीनगर
सामाजिक समतेचे प्रतीक असलेली . विद्यापीठ प्रति कमान तोडणाऱ्या प्रशासनाविरुद्ध तात्काळ कारवाई करा.
नसता आंबेडकरी समाज प्रशासनाच्या हुकूमशाही विरोधात संपूर्ण आंबेडकरा समाज रस्त्यावर उतरणार. या मागण्या महाराष्ट्र शासनाने तात्काळ मान्य करून आंबेडकर समाजाला न्याय देण्यात यावा.
आज पक्षीय आंबेडकरवादी पक्ष, संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समिती समितीच्या वतीने मा. श्री दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर. यांना जाहीर निवेदन देण्यात आले. छत्रपती संभाजी महानगरपालिकेने सुरू केलेली. अतिक्रमण मोहीम शहरातील गोर गरीब, कष्टकरी कामगार ,वंचित, दलित पीडित, बहुजन समाजाच्या जीवावर उठले आहे. यामध्ये दलित पॅंथरच्या सामाजिक लढ्यात अनेक शहीदाने आपले रक्त सांडून दिवंगत अंथर नेते गंगाधर जी गाडे यांच्या नेतृत्वात या सलम वसाहतीत निर्वासित वंचित बांधवांना निवारा मिळावा म्हणून उभारण्यात आल्या होत्या. या वसाहती योजनांचा शासन निर्णय द्वारे निमितही करून दिले आहेत. अनेक शासकीय योजनेचा लाभ घेऊन येथील गोरगरीब समाजाने झोपडपट्ट्यांचे रूपांतर आपल्या घामाच्या पैशाने पक्या घरामध्ये केले आहे. ज्यांची घरे रोडला आली.
त्यांनी कुटुंबव्याच्या उदरनिर्वानासाठी दुकाने थाटून छोटे-मोठे व्यवसाय करण्यात सुरुवात केली होती. त्याचदरम्यान नामांतराचे लढायचे प्रतीक म्हणून विद्यापीठाच्या कमानीच्या कमानी समान नामांतर योद्धा च्या बलिदानाची साक्षी देणाऱ्या समानतेचे प्रतीक सामाजिक संघर्षाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या विद्यापीठ कमानीच्या प्रति कमानी अनेक दलित वस्त्यांमध्ये बांधण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे एक प्रतिक्रमान मुकुंदवाडी संजय नगर या ठिकाणी होती. परंतु शहरातील काही सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सत्तेचा दबाव प्रशासनावर टाकून विकासाच्या रस्ता रुंदी करण्याच्या नावाने या 50 ते 60 वर्ष जुन्या वसाहती. सामाजिक अस्मितेच्या प्रतीक असलेल्या कमानी, निळ्या व पंचशील धार्मिक झेंड्याचे चौक, बुद्धविहाराच्या कमान समाज बांधवांना पूज्यनीय भिकू संघाला विश्वासात न घेता जेसीपी ने उध्वस्त केले आहेत. आणि आता चिकलठाणा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक ही तोडण्याचा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. परंतु इतर धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढता केवळ आंबेडकर समाजाचे अस्मिता असलेल्या कमानी, झेंडे महामानवाच्या स्मारक काढण्यात येत आहे. यामुळे एका दलित बहुजन समाजाला आणि टारगेट करण्यात येत आहे.
आमच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार शहरात घडत असून यामुळे समस्त आंबेडकरी समाजाला टारगेट करून अगोदर हर्षल,मुकुंदवाडी , चिकलठाणा कांचनवाडी नक्षत्र वाडी विश्रांत नगर या वसाहती उध्वस्त करण्याचे षडयंत्र येथील काही सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी अकले आहे का असा संशय व असुरक्षितची भावना मागासवर्गीय,दलित, बहुजन समाजाच्या मनात निर्माण झाली आहे. या कारवाईमध्ये महानगरपालिका प्रशासनाला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र ( सुधारणा निकासी आणि पुनर्विकास) कायदा १९७१, दुरुस्ती २०१७ मधील तरतुदी आणि कायदेशीर जबाबदाऱ्याची पाय मली करताना. येथील मनपा प्रशासन दिसत आहे. कारण या शासन निर्णयानुसार या कायम केलेल्या वसाहतींना निष्कासित करण्या अगोदर त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश असतानाही कुठल्याही प्रकारचे बाधित होणाऱ्या मालमत्तेचे पंचनामे न करता या मालमत्ता उध्वस्त करण्यात येत आहेत. सदरील वसाहतीत उदरनिर्वाह करणारे गोरगरिबांची निवासी घरे तोडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र प्रशासनाकडून त्यांची तात्काळ दखल घेऊन. त्यांचे तात्काळ पुनर्वसन करावे. व आमच्या सामाजिक अस्तित्वाचे प्रतीके तोडून आमच्या सामाजिक धार्मिक भावना दुखवणाऱ्या जबाबदार अधिकारी व मनपा व आयुक्तावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा.
नसता येत्या सात दिवसात समस्त आंबेडकर समाज व आंबेडकरवादी पक्ष, संघटनेच्या वतीने प्रशासनाविरोधात भव्य महामोर्चा काढण्यात येईल. असा इशारा प्रशासनाला आंबेडकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष मा. दीपक निकाळजे , अमित मगरे, शिवशाही इंगळे, अरविंद कांबळे, सचिन जोगदंड, सचिन बागुल, सोनू नरवडे, कपिल बनकर, महेंद्र काटेकर, संतोष चव्हाण, स्वागत उटी कर, राजकुमार कांबळे, भगवान खिल्लारे, प्रशांत मस्के, सुरेश सोनटक्के, विजय शिंगारे, अनामी मोरे, कृष्णा शरणागत, शैलेश मकासरे इतर असंख्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष मा. दीपक निकाळजे साहेब यांनी जनाधार झी न्यूज 24 तास ला दिलेला प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.