जळगाव जिल्हा प्रतिनिधी/ दिनेश सोनवणे /
स्वा सै पं ध थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता जि जळगाव या विद्यालयात दि. 6/7/2025 रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडी सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत शाळेच्या परिसरात भव्य दिंडी काढली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी,उप मुख्याध्यापक श्री जी डी बच्छाव सर,पर्यवेक्षक श्री के पी . पाटील सर , ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी तसेच वार्ताहर श्री समाधान पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यानंतर “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात पालखीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अभंग गायन, फुगडी, लेझीमपथक व ‘ झांज पथक आणि वेशभूषा करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण म्हसावद गावातून पाय दिंडी काढण्यात आली . मुस्लिम बांधवांचा पवित्र सण मोहरम निमित्ताने त्यांनी हिंदू मुस्लिम बांधवांचे एकतेचे दर्शन झाले. मुस्लिम बांधवांनी दिंडीला मोठ्या मनाने खांदा दिला आणि दर्शन घेतले.



या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची माहिती मिळाली तसेच भक्तीपरंपरेचे महत्त्व अधोरेखित झाले. पालखी सोहळ्यात शिक्षक, पालक व ग्रामस्थांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. शाळेच्या व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजतात असे मत व्यक्त केले.
संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याने एकादशीचा उत्सव सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. समारोपाच्या वेळेस म्हसावद गावातील श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ यांचा रुमाल, श्रीफळ व टोपी देऊन सत्कार करण्यात आला सर्वांना केळीचे प्रसाद वाटप केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .