माहूर तालुका प्रतिनिधी
बजरंगसिंह हजारी
दि.06 ऑगस्ट
: श्री दत्त शिखर संस्थान दत्तात्रेय मंदिर माहूरगड येथील 8 ऑगस्ट रोजी दुपारी 04:00 वाजता निघणाऱ्या परिक्रमा यात्रा (नारळी पौर्णिमा) पंचक्रोशी वेढा यात्रेनिमित्त भाविकांना सोईसुविधा पुरविण्यासाठी नगर पंचायत कडून जय्यत तयारी करण्यात येत असून,त्या संदर्भातील कामाचा आढावा नगराध्यक्ष फिरोज दोसानी व मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवारी घेण्यात आला.
यावेळी त्यांचे सोबत शेख अफसर अली, इरफान सय्यद, रफिक सौदागर न. पं. कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड, लेखापाल विशाल मरेवाड, विद्युत अभियंता प्रशांत डोईजड, विजय शिंदे, गणेश जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.