आडगाव बु (प्रतिनिधी) – नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ आडगाव बु यांच्या वतीने यावर्षीदेखील सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी मंडळाकडून जी.प. महाविद्यालयातील शालेय ग्रंथालयाला शालेय उपयुक्त पुस्तके भेट देण्यात आली.
या कार्यक्रमात प्रा. गायकवाड सर यांनी विद्यार्थी जीवनातील ग्रंथालयाचे महत्त्व विशद केले. तसेच पो. पा. हितेशकुमार हागे यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावावी असे आवाहन केले.
यावेळी जी. प. शाळेचे प्राचार्य श्री. चारुदत्त मेहरे, डॉ. संतोष गायकवाड, श्री. सोळंके, श्री. प्रमोद दाते आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष विशाल देशमुख यांच्यासह हरीश देशमुख, विठ्ठल चतुरकर, सागर कोहरे, अनुप देशमुख, सुनील सोळंके, संतोष डाबेराव, गणेश डाबेराव आदी पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले.