घनसावंगी प्रतिनिधी – विजय कांबळे
घनसावंगी : मौजे आंतरवाली टेंभी येथे दुर्दैवी घटना घडली असून गावातील रोहिदास काळे (वय ५५) हे नरुळा नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आले.
रोहिदास काळे हे आदिवासी समुदायातील गरीब कुटुंबातील असून मोलमजुरी व मच्छीमार करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी पोलिस खात्याचे धनराज पवार, ग्रामपंचायत सदस्य जमीलभाई सिद्धीकी, जहूरभाई शेख, नासेरभाई शेख यांनी भेट देऊन परिस्थिती सांभाळली व मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
या घटनेची माहिती तीर्थपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पंचनामा व शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे गूढ उकलणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ही दुर्दैवी घटना पाहण्यासाठी नदिपूलावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
