( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
येथून जवळच असलेल्या बामणी पारे यथील उदगिरी साखर कारखान्यावर वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व डॉ. शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. कारखाना स्थळावर 10 हजार पेक्षा अधिक झाडांचे संगोपन करण्यात आले आहे. यावेळी 150 वृक्षाचे रोपण करण्यात आले आहे. कारखाना कार्यस्थळ व कारखाना कॉलनी परिसरात दोन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. भारती ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. 150 दात्यानी रक्तदान केले.