मिरज तालुका प्रतिनिधी/ अमोल मोरे
मिरजेत शहर बसस्थानकाजवळ अकिब जमादार या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. रॉडचा घाव वर्मी बसल्याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अकिब जमादार याची पत्नी पोलिस रेकॉर्डवरील खासगी सावकार आहे. पत्नीच्या सावकारी रकमेच्या देवाणघेवाणीच्या वादातून अकीब जमादार याच्यावर सोमवारी रात्री आठ वाजता बसस्थानकाजवळ एकाने रॉडने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
सावकारी देवाण-घेवाणीतून हा हल्ला झाल्याची चर्चा होती. मात्र, या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे