( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त व तमाम आरोग्य सेवकांचे गुरुवर्य व उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश दादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 27 जून 2025 रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे स्वर्गीय चिंतामणी कोंडोपंत गळवणी शैक्षणिक संकुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
शिबिराचे उद्घाटन आमदार सुहास बाबर व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा बाबर यांच्या हस्ते होणार आहे. विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोदराव गुळवणी व खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत आण्णा बाबर व मान्यवरांचे उपस्थिती असणार आहे. तसेच एकनाथ रक्तदाता सुरक्षा कवच योजना अंतर्गत प्रत्येक रक्तदात्याला दहा लक्ष रुपयांचा अपघाती विमा कवच मिळणार आहे. तरी याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गुळवणी यांनी केले आहे.
रक्तदात्यास आजीवन एक रक्ताची पिशवी मोफत दिली जाणार आहे तसेच कुटुंबातील सदस्यांना एक वर्षापर्यंत एक रक्ताची पिशवी मोफत दिली जाणार आहे.