(प्रतिनिधी – प्रदीप जोशी, विटे)
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील सोमवार, 28 जुलै 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळे, तसेच जनसंपर्काच्या सदिच्छा भेटींचा समावेश असून, त्यांचा संपूर्ण दिनक्रम पुढीलप्रमाणे आहे:
🔹 सकाळचा दौरा:
- 5.35 वा. – मिरज रेल्वे स्थानकात आगमन (महालक्ष्मी एक्सप्रेसने)
- 6.00 वा. – शासकीय विश्रामगृह, मिरज येथे विश्रांती
- 7.15 वा. – कवठेमहांकाळकडे प्रयाण
- 8.00 वा. – गावभाग, कवठेमहांकाळ येथे नगराध्यक्ष श्री. रणजित रमेश घाटगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
- 9.00 वा. – नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) कडे प्रयाण
- 9.15 वा. – राजमाता बैलगाडी शर्यत संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत “देवाभाऊकेसरी”, शालेय वह्यांचे वितरण व मुख्यमंत्री सहाय्यता निधी योगदान कार्यक्रमास उपस्थिती
🔹 दुपारचा दौरा:
- 10.00 वा. – उमदी (ता. जत) कडे प्रयाण
- 11.45 वा. – उमदी पोलीस स्टेशन येथे नवीन निवासी इमारतीच्या भूमिपूजनास उपस्थिती
- 12.45 वा. – जाडरबोबलाद कडे प्रयाण
- 1.15 वा. – प्राथमिक आरोग्य केंद्र, जाडरबोबलादचे लोकार्पण
- 1.45 वा. – जत कडे प्रयाण
- 2.30 वा. – विक्रम ताड यांच्या निवासस्थानी, ताडमळा, आचकनहळ्ळी रोड जत येथे विश्रांती
🔹 महत्त्वाचे उद्घाटन कार्यक्रम:
- 3.00 वा. – वनपरिक्षेत्र कार्यालय जत येथे नवीन कार्यालय व निवासस्थान उद्घाटन
- 3.30 वा. – जत नगरपरिषद येथे महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनास उपस्थिती (जलशुद्धीकरण केंद्र)
🔹 सायंकाळचा दौरा व जनसंपर्क भेटी:
- 4.45 वा. – खानापूरकडे प्रयाण
- 6.00 वा. – शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र, खानापूरबाबत नागरी सत्कार समारंभास उपस्थिती (श्रीराम मंदिर चौक)
- 7.15 वा. – विटाकडे प्रयाण
- 7.30 वा. – मयुरेश गुळवणी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट (विवेकानंद नगर, विटा)
- 7.55 वा. – सुशांत पवार, सरपंच, साळशिंगे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट (मायणी रोड, विटा)
- 8.15 वा. – ॲड. वैभव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट (यशवंतनगर, विटा)
- 8.45 वा. – आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट (बँक ऑफ इंडिया समोर, महावीर नगर, विटा)
- 9.15 वा. – किशोर डोंबे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट (कराड रोड, संभाजीनगर)
- 10.00 वा. – कराड रेल्वे स्थानकाकडे प्रयाण
या दौऱ्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संवाद साधणार असून विविध विकासकामांची गती, अंमलबजावणी आणि नव्या योजनांचे भूमिपूजन यामार्फत जिल्ह्यातील प्रगतीला चालना देण्याचा निर्धार दिसून येतो.
➤ [संपर्क – प्रदीप जोशी, पत्रकार, विटे]