प्रतिनिधी – काळा लिंबाळा, जि. पुणे :
शालेय विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक साक्षरता वाढावी या हेतूने सरस्वती अनाथ आश्रम संस्था, दापोडी, पुणे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळा लिंबाळा येथे संगणक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक बिराजदार सर, शिक्षकवृंद व इतर कर्मचारी, तसेच संस्थेचे संस्थापक देविदास सुरवसे, क्रांतीज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर सुरवसे, गावातील राहुल सुरवसे, योगेश सुरवसे, दिगंबर पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे महत्त्व सांगून त्याचा अभ्यासात कसा उपयोग करता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. संगणक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. उपस्थित मान्यवरांनी शिक्षणासाठी तांत्रिक साधनांची गरज अधोरेखित करत असे उपक्रम सातत्याने राबवण्याचे आवाहन केले.