सागर शिंदे पाटील प्रतिनिधी
आज मेहकर शहरातील श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालय येथे ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त योग दिन कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय लष्कराच्या पाकिस्तान विरुद्धच्या यशस्वी ऑपरेशन सिंदूर कारवाईचा गौरव आणि राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ योगाच्या माध्यमातून वीरांना सलामी देण्यात आली. यावेळी सौ.राजश्रीताई प्रतापरावजी जाधव,युवासेना सहसचिव तथा बुलढाणा जिल्हाप्रमुख श्री.ऋषीभाऊ जाधव,सौ.मयुरीताई ऋषीभाऊ जाधव व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
