धामोरी प्रतिनिधी. अथर्व वाणी
गावातील शांतता भंग करणारी एक धक्कादायक घटना रविवारी रात्री नऊ ते बारा या दरम्यान घडली.
चोरट्यांनी गावातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका सोनाराच्या दुकानावर धाडसी चोरी केली. या चोरट्यांनी दुकानाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण अंदाजे लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
ही घटना सोमवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांत प्रचंड खळबळ उडाली आहे.
स्थानिक पोलीस पाटील यांनी तात्काळ कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ माहिती दिली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.तसेच मुख्य बाजारपेठे मधील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे.
या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असुन नागरिकांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
चोरीचा तपास सुरू असुन पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाने वातावरण असुन अधिकृत सुरक्षेची मागणी करण्यात येत आहे