बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असणाऱ्या धारूर येथील महादुर्ग किल्ल्याच्या संदर्भात विविध मागण्यासाठी जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किसन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली किल्ले धारूर तहसील कार्यालयाच्या समोर आज एक दिवशीय उपोषण करण्यात आले
जवळपास जागर प्रतिष्ठानच्या दोनशेहून अधिक शिलेदारांनी उपोषणात सक्रिय सहभाग घेतला .
धारूर तहसीलचे तहसीलदार मा निळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर बोलणे करून दिल्यानंतर व संबंधित विभागाशी पत्र व्यवहार केल्याच्या नंतर एक महिन्याची मुदत देऊन हे उपोषण मागे घेण्यात आलेले आहे
गडाच्या पडलेल्या भिंतींचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, गायत्री कंट्रक्शन या संस्थेने अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे काम केलेले आहे त्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा, गड परिसरातील झाडे झुडपे नगर परिषदेच्या माध्यमातून काढून टाकण्यात यावेत, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमणाच्या विषयी एक समिती स्थापन करावी, गडावर दोन सुरक्षारक्षक कायमस्वरूपी तैनात असावेत या सह विविध मागण्यासाठी त्यांनी हे उपोषण केले होते
येत्या एक महिन्याच्या आत मागण्या मान्य न झाल्यास जागर प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बीडच्या समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे.यावेळी जागर प्रतिष्ठान चे 200 हून अधिक शिलेदार , धारूर येथील दुर्गप्रेमी ग्रामस्थ व विविध पक्ष संघटना यांनी यावेळी पाठिंबा दर्शवला आहे.