उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे,उरण येथे इयत्ता पाचवी ते दहावी अखेरच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या
विद्यालयाचे प्राचार्य साळुंखे बी.बी,लेखनिक नवनीत ठाकूर व उपशिक्षक दिगंबर पाटील यांच्या प्रयत्नातून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सुमारे ३००० वह्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.दातृत्वाचा महामेरू,शिक्षण प्रेमी, रयत शिक्षण संस्थेचे मैनेजिंग कॉन्सील सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे दरवर्षी श्री.रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील विविध शाळेत मोफत वह्या वाटप करीत असतात.त्यांचा लाभ फुंडे विद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी होत असतो .
विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, विद्यालयाचे प्राचार्य बी.बी साळुंखे,स्कूल कमिटीचे सदस्य सुरेश म्हात्रे,दिलीप तांडेल, उपमुख्याध्यापिका थोरात एस.डी, पर्यवेक्षिका बाबर एस.एम आणि पाटील एस.एस , गुरुकुल प्रमुख म्हात्रे ए.आर तसेच शिक्षण वृंदांचे हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख पाटील एच.एन यांनी केले . विद्यालयाच्या वतीने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे व अरुणशेठ भगत पनवेल तालुका भारतीय जनता पक्ष अध्यक्ष यांचे आभार मानण्यात आले आहेत.