( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
गलाई बांधव देशभर व्यवसायाच्या निमित्ताने विखुरले गेले परंतु ते आपल्या जन्मभूमीला आणि मातृभूमीला कधी विसरले नाहीत किंबहुना गावोगावच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान आहे असे प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी केले.
खंबाळे (भा ) येथे कै. भागिरथी पुनाजी सुर्वे व कै. पुनाजी भाऊ सुर्वे यांच्या स्मरणार्थ खंबाळे गावचे सुपुत्र श्री पोपट पुनाजी सुर्वे यांच्याकडून गावात प्रवेशद्वार कमान बांधण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा बाबर, ज्येष्ठ नेते जगन्नाथ दादा सुर्वे, अमोल सुर्वे,विजय सुर्वे, विष्णू सुर्वे, साहेबराव सुर्वे, अशोक पवार, लक्ष्मण शिरतोडे गुरुजी, दिलीप सुर्वे, विलास पाटील, अभिजीत पाटील, सुरेश पाटील, नेताजी पाटील, पोपट सुर्वे,पवन माने, सचिन सुर्वे, सुशांत सुर्वे,विनोद केंगार, दिलीप सुर्वे,संजय सुर्वे, विशाल सुर्वे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार बाबर म्हणाले, “आपल्या परिसरात कोणत्याही गावात जा, मंदिर असो, शाळा असो, सामाजिक सभागृह किंवा कमानी सारखी सुशोभीकरणाची कोणतीही कामे असो ती उभी करण्यात जे दानशूर हात पुढे येतात ते गलाई बांधवांचे असतात. समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना फार महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून हे मंडळी काम करत असतात. आज खंबाळे येथे सुर्वे कुटुंबियांनी देखील तोच आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे त्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अभिमान आहे.”
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर म्हणाले,” खंबाळे गाव हे नेहमी आदर्शवत राहिले आहे. या गावाच्या हद्दीत उभारण्यात येणाऱ्या वीस कोटी रुपये निधीच्या नियोजित ऑक्सिजन पार्कमुळे या गावाचा लौकिक सर्वदूर पसरणार आहे. परिसराच्या विकासात आम्ही कुठेही कमी पडणार नाही.”