(प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
कमळापूर सर्व सेवा सहकारी सोसा.लि. कमळापूरच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार सुहास बाबर समर्थकांनी विजय संपादन केला. विजयी पॅनलच्या संचालकांनी स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. आमदार सुहास बाबर व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
विजयी झालेल्याअजित अशोक साळुंखे,प्रमोद धोंडीराम साळुंखे, सुभाष शहाजी साळुंखे, सौ.राजाक्का नामदेव गायकवाड, सौ.वारणा दशरथ रेपे, अवधूत भगवान गायकवाड, अंकुश दादू गोतपागर, हणमंत गणपती शिरतोडे, सचिन आत्माराम नलवडे, अतुल भीमराव गायकवाड, राहुल संजय मोहिते, शंकर भीमराव साळुंखे आदीं संचालकांचा सत्कार आमदार सुहास बाबर व अमोल बाबर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विलास तात्या साळुंखे, विलासराव भगवान साळुंखे,पांडुरंग ज्ञानू साळुंखे,बाबासो भीमराव साळुंखे,विश्वास भगवान साळुंखे,राजकुमार गणपती साळुंखे,महेश निवृत्ती साळुंखे,बाळासो विठोबा गायकवाड,सुरेंद्र बाळासो पाटील,जयदीप बाळासाहेब पाटील, मच्छिंद्र मारुती गायकवाड,भगवान बाळू साळुंखे,निखिल आनंदा गायकवाड, प्रसाद शिवाजी साळुंखे, सत्यवान हिंदुराव साळुंखे आदि मान्यवर ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्यने उपस्थित होते
समर्थनाचे पत्र
अनेक वेळा ग्रामपंचायत किंवा सोसायटीच्या निवडणुका झाल्यानंतर विविध राजकीय पक्षाकडून गटाकडून सोसायटी जिंकल्याचा दावा केला जातो. परंतु कमळापूरची सोसायटी ही स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विचाराच्या व त्यांच्या समर्थकांनी जिंकली आहे संचालकामधून १३ पैकी ९ सदस्य निवडून आले आहेत. या नऊ सदस्यांनी बाबर समर्थक असल्याचे स्वतःच्या सह्यांचे पत्र देखील आमदार सुहास बाबर यांच्याकडे सुपूर्द केल्याचे कमळापूरचे ज्येष्ठ नेते विलास तात्या साळुंखे यांनी सांगितले.