( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे ))
ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी रु. १ कोटी ५ लक्ष निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली.
आमदार बाबर म्हणाले, आटपाडी तालुक्यातील आवटेवाडी २० लक्ष, कानकात्रेवाडी २० लक्ष, मासाळवाडी २० लक्ष तसेच खानापूर तालुक्यातील भेंडवडे गा २५ लक्ष, रेवणगाव २० लक्ष रुपये इतका निधी मंजुर झाला आहे. खानापुर आटपाडी मतदारसंघात प्रत्येक ग्रामपंचायतीला सुसज्ज असे ग्रामपंचायत कार्यालय असावे असा आपला प्रयत्न राहणार आहे. यापुर्वी स्व. आमदार अनिल भाऊ बाबर यांनी या योजनेअंतर्गत मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतींना इमारती बांधण्यासाठी निधी देऊ केला होता. त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण देखील या आटपाडी तालुक्यातील तीन आणि खानापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मतदारसंघातील कोणतीही ग्रामपंचायत इमारती विना राहणार नाही.” तसेच ज्या ग्रामपंचायतीना इमारत नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा म्हणून मी प्रयत्नशील राहणार असल्याचेही बाबर सांगितले