पेण प्रतिनिधि किरण बांधणकर
पेण पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग यांची नाशिक शहर येथे बदली झाली आहे. तीन वर्षांपूर्वी ते माणगाव येथून पेण पोलीस स्थानकात रूजू झाले होते. नुकतेच पेणच्या तरणखोप भागात दोन बांगलादेशी नागरिकांना पकडून महत्त्वपूर्ण कामगिरी केली. काही दिवसापूर्वी गुरुकुल शाळेच्या स्काऊट गाईड कार्यक्रमाकरिता लावण्यात आलेले तंबू आज्ञाताने जाळून शाळेला व विद्यार्थ्यांना नुकसान पोहोचवण्याचे हेतूने केलेल्या गुन्ह्यातील आरोपीला अस्पष्ट फुटेजवरून फक्त अट्हेचाळीस तासांच्या आत शोध घेऊन जेरबंद केले होते. सदरचे प्रकरण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संबंधी असल्याने जनतेमधून रोष निर्माण झालेला होता. तसेच भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या काळात एका माथेफिरूने देशाविरोधात चितावणीखोर पोस्ट करून पेणचे वातावरण गढूळ केले होते, त्यामुळे देखील नागरिकांमध्ये त्याचे पडसाद उमटले होते त्या आरोपीला देखील त्यांनी काही दिवसापूर्वी गजाआड केले आहे.
दोन वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी म्हणून स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळाली. या
कार्यकाळात बाळगंगा प्रकल्पातील नुकसान भरपाई बोगस मालक उभे करून लाटणारी टोळी, कामारली येथील बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम फोडणारी पुणे जिल्ह्यातील टोळी,उत्खननामध्ये सोने सापडले आहे ते कमी दरात विकून आमिष दाखवून लुटणारी कर्नाटक राज्यातील टोळी, नोकर भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मदत करणारी जालना-बीड भागातील टोळी, चेन स्नेचींग करणारी नेरळ भागातील इराणी टोळी, एसटी स्टँडवर चोरी करणाऱ्या गुलबर्गा व अंबरनाथ येथील टोळी, HPCL गॅस पाईपलाईन फोडून गॅस चोरी करणारी बिष्णोई टोळी, किराणा मालाची ऑनलाईन ऑर्डर करून फसवणूक करणारी पुणे येथील टोळी, स्वस्तात सोने देतो तसेच समांतर सीरियल नंबर असणारे डुबलीकेट नोटा पुरवण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणारी टोळी, व्हेल माशाची उलटी विक्री करून फसवलं करणारी टोळी, पार्किंग मधील उभ्या वाहनांमधील डिझेल चोरी करणारी नवी मुंबई भागातील टोळी, एटीएम कार्ड ची आदलाबदली करून फसवणूक करणारी मध्य प्रदेश राज्यातील टोळी, जादूटोणा, अघोरी प्रथा करणारी टोळी, गोमांस कत्तल करणारी कल्याण, कुर्ला भागातील टोळ्या,olx कॅमेरे लॅपटॉप यांच्या जाहिराती देऊन लोकांची फसवणूक करणारी टोळी अशा प्रकारच्या राज्यातील व परराज्यातील टोळ्यांना गजाआड केले.
तसेच रोडे काश्मिरे भागातील घरफोड्या, कोपरोलि गावातील घरपोडी, खरोशी-खारपाडा भागातील घरफोड्या, जगदंबा सिटी चिंचपाडा पेण येथील दिवसा झालेली घरफोड्या, ज्वेलर्स दुकानात नोकराने केलेली घरफोडी, बांधकामाच्या साइटवरून झालेल्या सी चैनल तसेच लोखंडी प्लेट चोरी, कोचिंग क्लास मधून सरस्वती देवीची चांदीची दहा किलो वजनाची मूर्ती चोरी, मंदिरचोऱ्या, सिमेंट चोरी ,सोनसाखळी , वाहन चोऱ्या इत्यादी अनेक गुन्ह्यांची उकल करून आरोपींच्य मुसक्या आवळल्या होत्या व गुन्ह्यातील मुदेमाल जप्त करून फिर्यादिना परत मिळवून दिला होता. CEIR पोर्टल वरून गहाळ झालेले अनेक मोबाईल नागरिकांना परत केले आहेत. अनेक पाहिजे आरोपी यांचा शोध घेऊन अटक केली आहे. संदीप बागुल व देवेंद्र पोळ पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यांचा यशस्वी तपास करतानाच अवैध धंद्यांविरूध्द धडक मोहीम सुरू करून धाडी टाकून अनेक कारवाया केल्या होत्या त्यामळे गन्हेगार व अवैध धंदेवाल्यांमध्ये चांगलीच जरब बसली होती.
या यशामध्ये त्यांना सहा पो फौजदर राजेश पाटील, पोह. प्रकाश कोकरे, पो.हवा सचिन वस्कोटे, अजिंक्य म्हात्रे,सुशांत भोईर, राजेंद्र भोनकर, संतोष जाधव,पोलीस ना. अमोल म्हात्रे,पो. कॉ. गोविंद तलवार यांची विशेष साथ मिळाली.वरिष्ठ अधिकारी सहकारी, कर्मचारी, पोलीस पाटील,शांतता कमिटी सदस्य तसेच नागरिकांशी ते मनमिळावूपणे वागत असल्याने एक विश्वासाचे नाते तयार झाले होते. या सर्वांना पेणवासियांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.