तालुका प्रतिनिधी – जनार्दन हाटकर
हदगाव शहरामध्ये राजरोसपणे अवैध गुटख्याची वाहनाद्वारे आयात करून शहरासह ग्रामीण भागात जीवघेण्या गुटखा व सुगंधी तंबाखू ची खुलेआम विक्री सुरू आहे या अवैध धंद्यात दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे अन्न व औषध प्रशासन लक्ष्मी दर्शनाच्या माध्यमातून धृतराष्ट्राची भूमिका घेत गुटखा तस्कर यांची पाठराखण करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे हे हिमायतनगर या शहरातून चार चाकी च्या माध्यमातून हदगाव शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची सकाळी तीन ते चारच्या सुमारास आयात केली जात आहे. हिमायतनगर हदगाव या दोन ठिकाणावरून अनेक शहरासह ग्रामीण भागात गुटखा पोहोचविला जातो
तालुक्यात ग्रामीण भागातील सर्वच किराणा दुकानात, कॅन्टींग पान टपरी धारकाच्या दुकानासमोर गुटखा तस्कर मोटरसायकल उभी करून त्यांना गुटका व सुगंधी तंबाखू पोहोचवीत व दर्शनी भागात गुटख्याची माळ लावून राजरोसपणे विक्री केल्या जाते हा सर्व प्रकार औषध प्रशासन अर्थपूर्ण संबंध जोपासत कारवाई करण्यास धजावत नाही. गुटख्यात मॅग्नेशियम कार्बोनेट सारख्या घातक घटकांमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजार होण्याची शक्यता सुद्धा आहे तंबाखूजन्य पदार्थामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये यासाठी राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटख्याच्या तंबाखूजन्य सुपारी पान मसाल्याच्या पदार्थाची निर्मिती आणि विक्रीवर बंदी घातली आहे.