( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक येथे महर्षी चित्रपट संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत खानापूर तालुक्यातील वाझर येथील विक्रम मारुती शिरतोडे दिग्दर्शीत इमेज या लघुपटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पुण्याच्या बत्ती ला द्वितीय तर मुंबईच्या रंगला तृतीय क्रमांक मिळाला. नाशिक येथील परशराम सायखेडकर नाट्यगृहात बक्षीस वितरण झाले. विक्रम शिरतोडे यांना प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले. निवडलेल्या लघुपटाना विनोदी अभिनेते आशिष पवार, नाशिकचे अभिनेते धनंजय साबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह संविधान प्रतिमा व रोख रक्कम देण्यात आली. कृष्णा वैष्णव, गोपाळ हरणे, अनुप जोशी प्रमुख पाहुणे होते. राजू देसले, सुनील मेढेकर, आकाश कंकाळ यांनी मनोगत व्यक्त केले.