परळी प्रतिनिधी : माणिक बनसोडे
एसटी महामंडळाला विमान दुर्घटना नंतर तरी जाग येईल का? असा सवाल भारतीय दलित पॅंथर चे जिल्हाध्यक्ष : मा. वैजनाथ रावजी गायकवाड साहेब यांनी केला आहे. एस टी महामंडळाच्या वतीने प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मोडक्या गाड्यामुळे, गळक्या गाड्या मधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे मायमाऊल्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. महाराष्ट्र शासनाने एसटी मधून प्रवास करण्यासाठी अनेक सवलती दिल्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहे नादुरुस्त भंगारगाड्यातून प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रवासी मृत्युमुखी पडत आहेत. मृत्यूचे तांडव थांबा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यासाठी महाराष्ट्र मध्ये आंदोलन उभा करावी लागेल. असा तीव्र इशारा एस टी महामंडळाला बीड जिल्हाध्यक्ष : मा. वैजनाथराव गायकवाड यांनी दिला आहे.
रस्त्यावर मृत्युमुखी पडलेला दोन लाख रुपये आणि विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्यांना एक कोटी कोटी रुपये हा सरळ सरळ भेदभाव आहे. म्हणजे सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि पैशावाल्यांना वेगळा न्याय हा अन्याय आहे. कारण कंडक्टर वाहक हे सुद्धा आपला जीव धोक्यात घालून प्रशांची वाहतूक करत असतात. त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. म्हणून भारतीय दलित पॅंथर च्या वतीने मागण्या करण्यात येत आहे. 1)एसटीमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना प्रत्येकी एक कोटी विमा मंजूर करावा. 2) ड्रायव्हर व कंडक्टर साठी दोन कोटी विमा मंजूर करावा. या प्रमुख मागण्या महाराष्ट्र शासनाने तात्काळ मंजूर करून त्यांना न्याय द्यावा. सदरील ही घटना गंभीर असून महाराष्ट्र शासनाने या मागण्या तात्काळ मंजूर करून. प्रवासी व कंडक्टर व ड्रायव्हर यांना न्याय मिळवून देण्यात यावा. या मागण्याचे निवेदन महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्री साहेबांना लवकरच भारतीय दलित पॅंथर च्या वतीने देण्यात येणार आहे. जर महाराष्ट्र शासनाने या मागण्याची गंभीर दखल घेतली नाही. तर भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनावर राहील. असा इशारा परळी तालुका अध्यक्ष: मा. माणिकराव बनसोडे भारतीय दलित पॅंथर यांनी दिला आहे. असे प्रसिद्ध असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.