(प्रदीप जोशी, पत्रकार, विटे)
सांगली जिल्ह्यातील सर्व समाज घटकांना सामावून घेऊन समावेशक भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात बांधणी करणार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली नूतन जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी केले जिल्हाध्यक्ष झालेले आणि पहिल्यांदाच आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले विवेक कोकरे यांचा सत्कार आटपाडी तालुका युवक अध्यक्ष सुरज पाटील यांच्या हस्ते करणेत आला .
आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून तुमच्या भावनांचा आदर होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे . राष्ट्रवादीच्या नेत्यांवर काही वाचाळवीर सतत बेछुट, निराधार टीका टिपन्नी करीत आहेत . अशा वाचाळ विरांना जशास तसे उत्तर दिले जाईल . जशी महात्मा गांधीची विचारधारा आम्हांला शिरसावंद्य आहे . तसेच क्रांतीवीर भगतसिंह, क्रांतीवीर सुखदेव, क्रांतीवीर राजगुरू, यांच्या विचार प्रणालीवर ही आम्ही प्रेम करणारे आहोत . हे ही आम्ही या वाचाळवीरांना निश्चित दाखवून देऊ . असा इशाराही विवेक कोकरे यांनी यावेळी बोलताना दिला .
राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याच्या सुचना दि . ११ रोजी जलसंपदा मंत्री ना . राधाकृष्ण विखे – पाटील यांनी, सांगलीतील आढावा बैठकीत आमदार सुहासभैय्या बाबर यांनी उपस्थित केलेल्या मागणीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या . यातून १४० वर्षापासूनची मागणी सत्यात येऊ पहात आहे . राष्ट्रवादी ओबीसीचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी, आमदार सुहासभैय्या बाबर यांच्यासह १४ विद्यमान आमदार , ६ विद्यमान खासदार, ६ माजी आमदार, अन्य ४ मान्यवर महोदयांसह राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री , अन्य अनेक आमदार , खासदार, मंत्री, माजी मंत्री यांचे या प्रश्नी सतत लक्ष वेधण्याचे काम केले होते . हे लक्षवेधी कार्य सादिक खाटीक यांच्या सातत्याच्या जिगरबाज प्रयत्नातून यशस्वीतेकडे जात असल्याचे लक्षात घेऊन आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सादिक खाटीक यांचा विवेक कोकरे यांच्या हस्ते हृदयस्पर्शी सत्कार करणेत आला .
आमदार जयंतराव पाटील यांनी आटपाडी तालुक्यासह अन्य दुष्काळी तालुक्याचे नेतृत्व करावे . राजारामबापू उद्योग समुहातील अनेक उद्योग उदा . साखर कारखाना, दुध संघ, राजारामबापू बॅकेची शाखा वगैरे अनेक युनिट आटपाडी तालुक्यात उभे करावेत . बेंगलोर कॉरीडोर सारखी मोठी औद्योगिक वसाहत आटपाडीत साकारावी, आटपाडी तालुक्याचा आमदार, खासदारकीचा बॅकलॉग भरून काढावा . भविष्यात महामंडळे, जिल्हा बँक, जिल्हा नियोजन वर आटपाडी तालुक्याला झुकते माफ मिळावे . युवकाचे जिल्हा कार्याध्यक्ष पद , वरीष्ठांच्या विधानसभा मतदार संघ अध्यक्षपदी आटपाडी तालुक्याला संधी दिली जावी. अशा मागण्यांवर भाष्य करीत आमदार जयंतराव पाटील यांनीच आटपाडी, जत, कवठेमहंकाळ, खानापूर तालुक्यांचे नेतृत्व करावे अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या .
आटपाडी तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांची परवड थांबली पाहिजे, स्थानिक नेतृत्वाला महत्व दिले गेले पाहिजे . संघर्ष करणाऱ्या झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी जिल्हा राज्य नेतृत्वाने उभे राहीले पाहीजे . अनेक महिन्यांपासून रिक्त असलेली पक्षाची विधानसभा मतदारसंघ, तालुका अध्यक्ष या सारखी पदांवर निष्ठावान आणि सक्रिय नेतृत्वाला संधी द्यावी, तालुका जिल्हा स्तरावरच्या कामांना ताकद मिळावी, विधानपरिषद राज्यसभा सदस्यांच्या आमदार खासदार फंडापैकी ४० टक्के निधी दुष्काळी तालुक्यांना मिळावा . इत्यादी अनेक महत्वपूर्ण सुचना तालुका युवक अध्यक्ष सुरज पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष जालींदर कटरे, महिला जिल्हा उपाध्यक्षा इंजिनियर अनिता पाटील, आटपाडीचे नेते प्रभाकर नांगरे – पाटील, सोशल मिडीया अध्यक्ष किशोर गायकवाड, प्रशांत मोटे यांच्यासह अनेकांनी केल्या . आटपाडी तालुका अध्यक्षपद प्रभाकर नांगरे पाटील यांनाच द्यावे अशी मागणी सुरज पाटील यांनी केली .
यावेळी वाळवा तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, खानापूरचे अध्यक्ष मनोहर चव्हाण, नितीन डांगे, मनोज भोसले, विनोद बनसोडे, मुन्ना मुलाणी, विकास जाधव, सुरेश कदम, गणेश ऐवळे,आशिष जाधव, संतोष बाड, दिपक पाटील, प्रशांत मोटे, ऋषिकेश पाटील, राहुल रेड्डी, दत्तात्रय रावळ इत्यादी अनेक जण उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश ऐवळे सर यांनी केले व आभार मानले .