( प्रदीप जोशी,पत्रकार)
महिला क्रिकेट एकदिवसीय वर्ल्ड कप
2025 हा 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर यादरम्यान, भारत आणि श्रीलंका येथे होणार असून या स्पर्धेत 8 संघांमध्ये एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत. त्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. महिला एकदिवसीय वर्ल्ड कप 2025 चा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. यामध्ये यजमान भारत आणि श्रीलंका एकमेकांसमोर येतील. हायब्रिड मॉडेलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघ आपले सर्व सामने कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळेल.
भारतासह, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा वर्ल्ड कपमध्ये समावेश आहे. स्वरूपाबद्दल बोलायचे झाले तर, राउंड-रॉबिन नंतर नॉकआउट टप्प्यात 2 उपांत्य फेरी होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला वर्ल्ड कपमध्ये सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.
महिला एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक असे आहे.
30 सप्टेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका – बंगळुरू – दुपारी 3 वाजता
5 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो – दुपारी 3 वाजता
9 ऑक्टोबर: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – विशाखापट्टणम – दुपारी 3 वाजता
12 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – विशाखापट्टणम – दुपारी 3 वाजता
19 ऑक्टोबर: भारत विरुद्ध इंग्लंड – इंदूर – दुपारी 3 वाजता
23 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड – गुवाहाटी – दुपारी 3 वाजता
26 ऑक्टोबर: भारत विरुद्ध बांगलादेश – बंगळुरू – दुपारी 3 वाजता.