( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव व कोर कमिटी सदस्य गौरव गुळवणी यांचा रुग्णसेवा कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. कोल्हापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित मेळाव्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील व कक्ष प्रमुख मंगेश दादा चिवटे यांच्या उपस्थितीत हा सत्कार पार पडला. रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत मिळवून देणे रुग्णांना बिलात सवलत मिळवून देणे , रुग्णांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच रुग्णांना विविध ट्रस्ट कडून निधी उपलब्ध करून देणे, अशा अनेक समाजकार्याच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेऊन गौरव गुळवणी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गौरव गुळवणी यांनी बोलताना सांगितले आजपर्यंत आमचे दैवत स्व अनिल भाऊ बाबर व आमदार सुहास भय्या बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सांगली जिल्ह्यात जवळपास पावणेदोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून वितरित करण्यात आला. तसेच रुग्णांचे लाखो रुपयांचे बिलात सवलत व माफ करण्यात यश आले आहे. तसेच जवळ पास 150 रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेत अंतर्गत मोफत उपचार करून देण्यात आले.
यावेळी नामदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर, आ. सुजित मिंचेकर, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत, मार्गदर्शक युवराज नाना काकडे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते