( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
सन २०२५ सालचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार पंजाब मधील प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर जगमोहन सिंह यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ विटाचे संघटक ॲड सुभाष पाटील यांनी दिली.
प्रो. जगमोहन सिंह हे पंजाब मधील फार मोठे कृषी शास्त्रज्ञ असुन ते शहीद भगतसिंह यांचे भाचे आहेत. शहीद भगतसिंह यांच्या भगिनी बेबी अर्जित कौर व सरदार माखनसिह यांचे सुपुत्र आहेत. आपल्या आईच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्यामुळे त्यांना वयाच्या केवळ पहिल्या वर्षीच ब्रिटिशांचे तुरुंगात जावे लागले. दीड वर्ष त्यांनी आईबरोबर कारावास भोगला. या तुरुंगातच त्यांना नेता जिच्या आझाद हिंद सेनेतील सैनिकांचा सहवास लाभला. भारतातील नामांकित आयआयटी खरगपूर मधून त्यानी प्रथम क्रमांकाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर ची पदवी संपादन केली. लुधियाना येथील पंजाब क्रुषी विद्यापीठ मधे इलेक्ट्रिकल इंजिनिअर विभाग प्रमुख म्हणून काम केले. तेथे त्यांनी शेती साठी बोअर वेल वरील संवचलीत इलेक्ट्रिकल स्टारटर शोधुन विकसित केले.सामान्य शेतकऱ्यांसाठी हे फार मोठे काम त्यांनी केले आहे.
त्यांच्या शैक्षणिक कामाशिवाय यांच्या विचार प्रचार व प्रसाराचे फार मोठे काम केले आहे.हे अतिशय महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. शहीद भगतसिंग यांचे नावाने वेब साईट व वेबसेरीज निर्माण करुन भगतसिंह व त्यांच्या सहकाऱ्यांचे मुळ कागद पत्र शोधून काढले. त्याचे जेलमधील रेकॉर्ड व जेल डायर्या शोधुन , त्याचे मुळ फोटो शोधून ते या वेब सेरीजवर लोड करून सर्व वाचकांना, अभ्यासकांना, संशोधकाना उपलब्ध करून दिले. पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले.गदर पार्टीचा इतिहास संशोधन करुन प्रसिद्ध केला.
आणिबाणी चे काळात लोकशाही हक्काचे रक्षण करण्यासाठी, समाजातील कष्टकरी वर्ग व स्त्रियाना न्याय देण्यासाठी संघटना निर्माण केली.
गेल्या दोन वर्षांपूर्वी दिल्ली चे बाहेर संपूर्ण वर्षभर शेतकर्यांनी जे अभूतपूर्व ठिय्या आंदोलन केले त्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उभे राहिले. त्यांच्या आईचे नाव बिबि अमरजित कौर असे आहे. शाहिद भगतसिंह यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार केला.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाच्या वतीने या वर्षीचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रोफेसर जगमोहन सिंह यांना देणेचा निर्णय घेतला आहे.जगमोहण सिंह यांनी सदर पुरस्कार स्विकार करणेची अनुमती दिली आहे.दि ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ठिक दीड वाजता वाजता क्रांतिसिंह नाना पाटील सभागृह विटा येथे जेष्ठ पत्रकार संजय आवटी यांचे हस्ते हा पुरस्कार सोहळा होणार आहे. मानपत्र , सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ व रोख रक्कम रु.२१०००/-असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.
या अगोदर आचार्य शांताराम गरुड, क्रांतिवीर नागनाथअण्णा, प्रा. डॉ. भाई एन. डी. पाटील, भाई गणपतराव देशमुख, काॅम्रेड क्ऱुष्णा मेणसे , साथी म्रुणालताई गोरे ., प्रा. आ. हे.साळुखे, न्यायमुर्ती कोळसे पाटील, न्यायमुर्ती बी.एन. देशमुख, साथी मेधाताई पाटकर, विकास आमटे, डॉ अभय बंग, काॅ. अशोक ढवळे, काॅ. सिताराम येचुरी, पत्रकार पी. साईनाथ, डॉ. गणेश देवी, काॅ वृंदा करात , काॅ भालचंद्र कांगो, काॅ अतुल कुमार अंजाना , मा. तुषार गांधी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. .