अहिल्यानगर_प्रतिनिधी संतोष राठोड. नालेगाव येथील लोकमंगल गृहनर्माण संस्थेमध्ये 500 स्क्वेअर फुटाचे प्लॉट देण्याचे आमिस दाखवून तिघाकडून सात लाख 25 हजार रुपये घेऊन हा प्लॉट त्यांना न देता तसेच घेतलेली रक्कम ही परत न देता फसवणूक केल्याची घटना एक मार्च 2012 पासून ते 12 जून 2025 दरम्यान घडली. याबाबत कैलास नाम पेली उषा कोयल (वय६१ रा . झरेकर गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की प्रकाश भुमय्या कोटा (रा. बालाजी सोसायटी नगर कल्याण रोड) व अशोक बाळू पुंड (रा. साई गजानन कॉलनी लेखा नगर सावेडी) यांनी 2011 सली फिर्यादी यांना सांगितले की आम्ही लोक मग गहनिर्माण सहकारी संस्था ना लेगाव येथे स्थापन करणार आहोत . सदर योजनेअंतर्गत रहिवाशाची प्रत्येकी 500 चौरस फुटाचे प्लॉट कमी भाव मध्ये समाजातील गरजवंत लोकांसाठी देणार असून याबाबत प्रक्रिया शासकीय कार्यालय चालू आहे. फिर्यादी यांना राहण्यासाठी घराची आवश्यकता असल्याने त्यांचे बोलण्यावर विश्वास ठेवून व त्याबाबत ॲड. आर आर पिल्ले, नोटरी पब्लिक, कोर्ट गल्ली येथे एक मार्च 2012 रोजी करारनामा करून त्या व्यवहारापोटी प्रकाश कोटा व अशोक कुंड यांना लोक मांगल गृहनिर्माण संस्थेचे नाव वने फिर्यादी यांनी 75 हजार रुपये, पत्नी रत्नमालाईने 75000 , मुलगा सचिन याने 75 हजार रुपये व लहान मुलगा आकाश याने 75 हजार रुपयाची एकूण तीन लाख रुपये दिले. लक्ष्मण राजया श्री गादी यांनी त्याचे चार मुले यांचे नावे व तीन लाख रुपये महाराष्ट्र बँक खात्याची चेक व पावत्या द्वारे दिले होते. फिर्यादी यांचे बहिण शशिकला सत्यनारायण मिटापिल्ली हिने लोक मंगल ग्रह निर्माण मध्ये प्लॉटसाठी एक लाख 25 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. त्यानंतर प्रकाशकोटा व अशोक पुंड हे कोणतीही कायदेशीर कारवाई करीत नसल्याने यांनी त्यांना याबाबत विचारणा केले असता त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगी बाबत व संस्थेमार्फत प्लॅन मंजूर करून घेण्यासाठी शासकीय कार्य प्रक्रिया चालू असल्याबाबत सांगितले. त्यानंतर फिर्यादी व इतर लोकांनी याबाबत दोघांकडे वारंवार विचारणा केली असता त्यांनी लोकमंगल संस्थेची मीटिंग होणार आहे असे. सांगून प्लॉटचा ताबा देण्यासाठी कोणती कारवाई केली नाही. म्हणून फिर्यादी यांनी सरकारी ग्रह कार्यालय लोकमंगल ग्रह निर्माण संस्थेसंबंधी विचारना केली असता या संस्थेची परवानगी बाबत फाईल व प्रस्ताव प्रलंबित नसले बाबत समजले. त्यानंतर फिर्यादी यांनी बाबत. प्लॉटचा ताबा द्यायला बाबत वारंवार विचारणे केली असता ते उडवडीची उत्तरे देऊ लागले व पैशाची मागणी केली असता पैसे परत देण्यास नकार देऊ लागले. दोघांनी फिर्यादी व इतर अनेक लोकांकडून प्लॉट न देता तसेच घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली आहे. त्यामुळे याप्रकरणी कोतवली पोलीस ठाण्याते कैलास उषा कोयल यांनी दिलेला फिर्यादीवरून प्रकाशकोटा व अशोक पुंड यांची विरुद्ध बी एन एस 316 (२),३१८(४),३(५) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार हे करीत आहे.