परळी प्रतिनिधी / माणिक बनसोडे
मौजे नागापूर येथे अहिल्याबाई होळकर चौकामध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन तथा झेंडावंदन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर गावचे आदर्श नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक भानुदास दादा सोळंके नागापूर गावचे भूषण सर्वांचे लाडके मा. गणेश राव सोळंके, नागपूर जिल्हा परिषद शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष मा. सोनटक्के साहेब, युवा नेते राम सोळंके, मुसळेवाडी चे युवा नेतृत्व मा. मुसळे भैय्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागापूर अहिल्याबाई होळकर चौकामध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी मार्गदर्शन केले. तसेच परळी तालुका अध्यक्ष भारतीय दलित पॅंथरचे तालुका अध्यक्ष मा. माणिकराव बनसोडे यांनी सर्व सर्वांना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आले आहेत. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.