• About Us
  • Contact Us
  • Join us
Saturday, June 7, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

Amol Sangamwar by Amol Sangamwar
June 6, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
23
VIEWS

★ सरपंच ताई म्हणतात मी पूर्वी पासून भाजपचीच

झरी जामणी : तालुका प्रतिनिधी

वणी विधानसभा मतदारसंघातील अडेगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित महिला सरपंच कोणत्या पक्षाच्या आहे ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. निवडून आल्यानंतर आपल्या पतीदेवसह आमदार संजय देरकर यांचे घरी भेटायला गेलेल्या महिला सरपंच गंगा एकनाथ काटकर यांच्या गळ्यात आमदार महोदयांनी भगवा दुपट्टा घालून हा विजय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा आहे असे घोषित केले. तर काही वेळाने भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट घेऊन सरपंच महोदयांनी मी पूर्वीपासून भाजपची म्हणत हसऱ्या चेहऱ्यानी कमळाचा दुपट्टा स्वीकारला. वेगवेगळ्या दिवशी काढलेल्या या दोन फोटोमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार झरी जामणी तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सुनीता लालसरेसह एक सदस्याला विभागीय आयुक्त यांनी अपात्र ठरविले होते. त्यामुळे 11 सदस्य असलेल्या अडेगाव ग्राम पंचायतीमध्ये 9 सदस्य शिल्लक राहिले. सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत ग्राम पंचायत सदस्या गंगा एकनाथ काटकर ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्या.सरपंच निवडणूक जिंकल्यावर सरपंच गंगा काटकर यांनी आपल्या इतर 4 सदस्यांसोबत 30 मे रोजी आमदार संजय देरकर यांची भेट घेण्यासाठी त्यांचे वणी येथील निवास स्थानी गेल्या. त्यावेळी देरकर यांनी सरपंच गंगा काटकर यांच्या गळ्यात भगवा दुपट्टा घालून हा विजय शिवसेना (UBT) गटाचा आहे, असे जाहीर केले होते. तर गुरुवार 5 जून रोजी नवनिर्वाचित सरपंच गंगा काटकर ह्यांनी दोन ग्राम पंचायत सदस्यांसह माजी आमदार भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे निवास स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी बोदकुरवार यांनी भाजपच्या सरपंच निवडणून आल्या म्हणून सरपंच गंगा काटकर व सदस्यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा घालून सत्कार केला. या दोन्ही फोटो तसेच एका न्युज पोर्टलमध्ये ‘चुरशीच्या लढाईत शिवसेनेच्या गंगाबाई काटकर विजयी’ या बातमीमुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, की अडेगावच्या सरपंच मॅडम अखेर कोणत्या पक्षाच्या ?या बातमीमुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, की अडेगावच्या सरपंच मॅडम अखेर कोणत्या पक्षाच्या ?

लोकप्रतिनिधीच्या नात्याने घेतली आमदाराची भेट

निवडणून आल्यानंतर वणी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून औपचारिक भेट घेण्यासाठी मी ग्राम पंचायत सदस्यांसोबत आमदार संजय देरकर यांचे घरी गेल्या होत्या. त्यांनी दुपट्टा घालून सत्कार केला. परंतु मी पूर्वी पासून भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता आहे व आताही भारतीय जनता पक्षाची सरपंच म्हणून काम करीत आहे. कुणी काय म्हणत आहे किंवा कशी बातम्या लागल्या याबाबत मला काही ठाऊक नाही.गंगा एकनाथ काटकर सरपंच, ग्रामपंचायत अडेगाव

गंगा एकनाथ काटकर सरपंच, ग्रामपंचायत अडेगाव

Previous Post

जमलं हो! ‘लाडकी बहीण’ योजनेचा सन्मान निधी वाटप सुरू; मे महिन्याचा हप्ता आजपासून खात्यात….

Next Post

शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

Related Posts

Uncategorized

जमलं हो! ‘लाडकी बहीण’ योजनेचा सन्मान निधी वाटप सुरू; मे महिन्याचा हप्ता आजपासून खात्यात….

June 6, 2025
Uncategorized

खरीप हंगाम पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

June 5, 2025
Uncategorized

मूळस-हेवाळे मार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक बंद

June 4, 2025
Uncategorized

झेंडीगेट येथे 350 किलो गोमास जप्त

June 4, 2025
Uncategorized

सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण : नांदेकर यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

June 3, 2025
Uncategorized

जून महिन्यामध्येच मिळणार तीन महिन्यांचे एकत्रित धान्य

June 3, 2025
Next Post
शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

सर्वाधिक पसंतीच्या

  • नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी परिसरात मुसळधार पावसामुळे बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खडकी गावात मुसळधार पावसामुळे तीन घरे जमीनदोस्त; मदतीची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा

मौजे नागापूर कॅम्प येथे डॉ. मुंजा मस्के यांचा विविध उपक्रम राबवून 35 वा वाढदिवस साजरा

June 7, 2025
शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

शिवराज्याभिषेक सोहळा दिन नागापूर ग्रामपंचायत च्या वतीने संपन्न.

June 7, 2025

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 6, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group