• About Us
  • Contact Us
  • Join us
Sunday, June 8, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop

विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित भव्य उन्हाळी प्रदर्शन व विक्री

Janadhar News by Janadhar News
May 15, 2025
in Uncategorized
0
विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित भव्य उन्हाळी प्रदर्शन व विक्री
0
SHARES
24
VIEWS

(प्रदीप जोशी, पत्रकार )
विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित दिनांक १७ आणि १८ मे रोजी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यत सूर्या मॉल विटा येथे भव्य उन्हाळी प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले असल्याची माहिती विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या संस्थापिका अ‍ॅड. शाहीन विपुल तारळेकर आणि समन्वयक सौ. प्रतिभा दबडे यांनी दिली.
अ‍ॅड. शाहीन तारळेकर आणि सौ. प्रतिभा दबडे यांनी पुढाकार घेऊन महिलांचे व्यासपीठ उभे करण्याचा निर्णय घेत व्यवसाय मार्गदर्शन करण्या साठी व महिलांच्या व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी सन 2019 मध्ये ‘विटा लेडीज बिजनेस असोसिएशन’ची स्थापना केली. छोटे व्यवसाय करत असलेल्या व भविष्यात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांना या ग्रुपमध्ये एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुरुवातीला व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केला. एक हजारपेक्षा जास्त महिला या ग्रुपच्या सदस्य आहेत.
विटा लेडीज बिजनेस असोसिएशनची व्याप्ती वाढत जाऊन पाच ते सहा हजार महिला फेसबुक ग्रुपला विटा परिसरातील जोडल्या गेल्या आहेत. गल्ली-बोळातल्या कुरवड्या, शेवया, पापड करणाऱ्या, शिवणकाम करणाऱ्या, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या आणि मेहंदी कलाकार अशा कलात्मक कामे करणाऱ्या तसेच कपड्यांची विक्री करणाऱ्या व बाहेर कामासाठी जाणाऱ्या पण स्वतःचा व्यवसाय करण्याची मानसिकता असणाऱ्या पाच हजार महिलांना व्हीएलबीएच्या व्यासपीठावर एकत्र आणण्यात यश मिळवले. व्यावसायिक विचारांची देवाणघेवाण, एकमेकींच्या कामात मदत, विस्तार करणे व आर्थिक चक्र ग्रुपमधून फिरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.


विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित सूर्या मॉल विटा येथे भव्य उन्हाळी प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये
कोरियन स्टाईल ड्रेस आणि टॉप, कोटन साडीज़ आणि कूर्ती, बॉडी चेकअप, वन ग्रॅम दागिने, घरगुती बेकरी आणि उन्हाळी पदार्थ, कोल्हापुरी मसाले, ऑरगॅनिक सौंदर्य प्रसाधने, परफ्यूम, मातीची भांडी ,पुस्तके आणि वह्या, शालेय वस्तू, घाण्याचे तेल ,जूटचे साहित्य, इलेक्ट्रिकल बाईक, मोबाईल फर्नीचर खरेदी करण्याची संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. मोफत डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर हे या एक्सिबिशनचे खास आकर्षण आहे.
या समर स्टोरी उन्हाळी प्रदर्शनाचे उदघाटन 17 मे 2025 सकाळी 11 वाजता सुर्या शॉपिंग मॉल येथे मी सक्षमा फौंडेशनच्या अध्यक्षा
सौ. पूजा विशाल पाटील, मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड, उद्योजिका, पर्यावरणप्रेमी, मोटारसायकल रायडर सौ. निशिगंधा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे. महिला व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भरभरून खरेदी करण्यासाठी आपल्या परिवारासह व मित्र आप्तेष्टांसोबत प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Pradip Joshi
Previous Post

आदर्श विद्यामंदिरचा दहावी निकाल 100 टक्के

Next Post

नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

Related Posts

Uncategorized

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 6, 2025
Uncategorized

जमलं हो! ‘लाडकी बहीण’ योजनेचा सन्मान निधी वाटप सुरू; मे महिन्याचा हप्ता आजपासून खात्यात….

June 6, 2025
Uncategorized

खरीप हंगाम पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

June 5, 2025
Uncategorized

मूळस-हेवाळे मार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक बंद

June 4, 2025
Uncategorized

झेंडीगेट येथे 350 किलो गोमास जप्त

June 4, 2025
Uncategorized

सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण : नांदेकर यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

June 3, 2025
Next Post

नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

सर्वाधिक पसंतीच्या

  • नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी परिसरात मुसळधार पावसामुळे बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खडकी गावात मुसळधार पावसामुळे तीन घरे जमीनदोस्त; मदतीची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

विटे वाहतुकीची कोंडी सुटणार तरी कधी?

June 7, 2025
हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

हणमंत वडीये येथे राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा

June 7, 2025
मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

June 7, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group