दाहिवडी :प्रतिनिधी संग्राम तुपे –
खडकी येथे दि. 23/05/2025 रोजी प्रधानमंत्री ग्राम सुरक्षा योजना अंतर्गत खडकी पाटोळे ते संभूखेड रस्ता या ठिकाणी रस्त्याचे मूल्यांकन करण्यात आले. या रस्त्याची एकूण लांबी 5.650 कि. मी. असून काम सुरू दिनांक 31/07/2023 तसेच काम पूर्ण होण्याचा दिनांक 30/7/2024 असून कंत्राटदाराकडून कामाचा हमी कालावधी पाच वर्षे इतका आहे तसेच कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सातारा यांच्या अधिकाराखाली आहे. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील लोकांनी समाधान व्यक्त केले.
