( प्रदीप जोशी, पत्रकार, विटा )
विटा पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांच्या गहाळ झालेल्या 3 लाख 25 हजार रुपये किमतीच्या मोबाईलचा शोध घेऊन ते पोलिसांनी जप्त केले. हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.
पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल गहाळ झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या आल्या आहेत. पंचलिंगनगर येथील गिरीदेव वसंतराव पाटील यांनी 23 डिसेंबर 2024 रोजी मोबाईल गहाळ झाल्याची फिर्याद दिली. त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटी करणं पथकाने गहाळ झालेल्या मोबाईल बाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे 25 मोबाईल शोधून काढले. ते मूळ मालकास परत करण्यात आले.