म्हसवड, दि. ७ जून – म्हसवड शहरातील प्रवाशांची दीर्घकाळची मागणी पूर्ण करत, आजपासून म्हसवड ते पुणे अशी थेट एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा दहिवडी डेपोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून, पहिली बस आज पहाटे ५:१५ वाजता म्हसवडहून फलटण मार्गे पुण्याकडे रवाना झाली.
ही मागणी म्हसवडचे माजी नगराध्यक्ष व लोकप्रिय नेते विजय धट (बंडू भाऊ) यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी प्रवाशांच्या मागणीकडे लक्ष देत संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार दहिवडी एस.टी. डेपोचे मॅनेजर श्री. डुबल साहेब आणि श्री. संतोष बोराटे यांनी तात्काळ सकारात्मक पाऊल उचलून सेवा सुरू केली.
ही बस सेवा सकाळी ९:३० वाजता पुणे येथे पोहोचते. पुण्याच्या दिशेने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे.
म्हसवड शहरातील सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

